
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जयपूरमध्ये बुधवारी आयपीएलच्या आगामी मोसमासाठी लिलाव पार पडला. या लिलावात अनेक खेळाडूंना कोट्यवधींची किंमत मिळाली. क्रिकेटमधील या लोकप्रिय संस्करणामुळे क्रिकेटला चार चाँद लागले तसेत खेळाडूंनाही मालामाल केले. परंतु यात एक असाही खेळाडू आहे ज्यासाठी 25 कोटींची बोली लागली असती. हिंदुस्थानचे माजी खेळाडू आणि कर्णधार सुनील गावस्कर यांनी या खेळाडूचे नाव सांगितले आहे.
छोट्या धोनीपासून गोनीपर्यंत, ‘या’ खेळाडूंना IPL लिलावात खरेदीदारच नाही
एका टीव्ही कार्यक्रमामध्ये बोलताना सुनील गावस्कर यांनी आजच्या घडीला आयपीएलमध्ये माझ्या शेजारी बसलेला खेळाडू असता तर त्याला 25 कोटींची किंमत मिळाली असती असे म्हटले. त्यावेळी गावस्कर यांच्या शेजारी हिंदुस्थानचे महान कर्णधार कपिल देव बसले होते. गावस्कर यांनी त्यांच्याकडे इशारा करताना आयपीएलमध्ये या खेळाडूला आज सर्वात जास्त किंमत मिळाली असती असे म्हटले.
माझं काय चूकलं? ‘IPL 2019’मध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूचे भावूक ट्वीट
गावस्कर यांनी कपिल देव यांचे कौतुक करताना म्हटले की, गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करत असल्याने या खेळाडूवर सर्वाधिक डाव लागला असता. तसेच यावेळी गावस्कर यांनी कपिल देव यांच्या 1983 च्या विश्वचषकातील नाबाद 175 धावांच्या खेळीचाही उल्लेख केला. गावस्कर यांच्या वक्तव्यावर दिलखुलास हसत कपिल देव म्हणाले की, माझ्या पाठोपाठ गावस्करलाही 10 ते 15 कोटी नक्कीच मिळाले असते.





























































