
सामना ऑनलाईन । मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या सध्या सात हजार मतांनी पिछाडीवर आहेत. या आकडेवारीमुळे राष्ट्रवादिला बालेकिल्ल्यात जबरदस्त धक्का बसणार असल्याचे चित्र आहे. भाजपच्या कांचन कुल या सध्या बारामतीतून आघाडीवर असल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. तसेच मावळ मतदारसंघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार देखील पिछाडीवर आहेत.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या मतदारसंघातून हरले तर निवडणूक प्रक्रियेवरून विश्वास उडेल असे सांगितले होते.






























































