
‘बेस्ट’ समितीचे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने आणि महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत सूर्यकांत व्यंकटराव महाडिक क्रीडांगण नूतनीकरण व सुशोभिकरण कामाचे लोकार्पण मौली सूर्यकांत महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, जगदीश पराडकर, सुमित महाडिक, संजय नटे, निमीष भोसले, महेंद्र नाकटे, राजेंद्र पोळ, अरूण हुले, शाखाप्रमुख उमेश करकेरा, संजय राठोड, योगिता म्हात्रे, मिनाक्षी पाटणकर, शशिकांत घाग, वैशाली कदम यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक 153 मधील कार्यकर्ते उपस्थित होते.




























































