
स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षाच्या महासचिव पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पार्टीची प्राथमिक सदस्यताही सोडली आहे. त्यासोबतच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये स्वामी प्रसाद मौर्य एका रॅलीत संवाद साधणार आहेत. त्यामुळे आता स्वामी प्रसाद मौर्य समाजवादी पार्टीपासून वेगळे झाले आहेत.
समाजवादी पक्षाला राजिनामा दिल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले, माझे अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाशी वैचारिक मतभेद आहेत. मी पारदर्शक राजकारणावर विश्वास ठेवतो. अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाच्या विचारधारांच्या विरोधात जात आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांनी मुलायम सिंह यादव यांच्यासोबतही काम करण्याचा अनुभव आहे. ते कट्टर समाजवादी नेता आबेत. जी लोकं त्यांच्या वारसा पुढे घेऊन जात आहेत ते त्यांच्या विचारधारेवर चालू शकत नाही याच गोष्टीचे वाईट वाटते. स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या नव्या पार्टीची घोषणाही केली. त्यांच्या नव्या पार्टीचे नाव राष्ट्रीय शोषित समाज पार्टी आहे. कारण स्वामी प्रसाद यांच्या पार्टीचा जो झेंडा आहे, त्यांच्यावर हेच नाव लिहीलेले आहे, 22 फेब्रुवारी रोजी ते आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये स्वामी प्रसाद मौर्य एका रॅलीत संबोधित करतील.
समाजवादी पक्षाच्या महासचिव पदाचा राजीनामा दिल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी अखिलेश यादव यांच्यावर भेदभावाचा आरोप केला होता. पक्षात आपली उपेक्षा केली जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. ते म्हणाले की, सपाच्या अनेक नेत्यांच्या वक्तव्यामुळे मी दुखावलो गेलो आहे. अखिलेश यादव यांच्याबाबत स्वामी प्रसाद म्हणाले की, त्यांनी जे काही दिले आहे ते सर्व मी त्यांना परत करीन. कारण पद माझ्यासाठी महत्त्वाचे नाही, विचार महत्त्वाचे आहेत. गरीब आणि शेतकऱ्यांचे कल्याण हे माझे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. जर त्याच्यावर हल्ला झाला तर मी प्रत्युत्तर देईन. त्यामुळे अखिलेश यांचे त्यांच्या शब्दांसाठी अभिनंदन. सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर अखिलेश यादव यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांचे नाव न घेता म्हटले होते की, काही लोकं फायदे घेतल्यानंतर निघून जातात. यावर प्रतिक्रिया देताना स्वामी प्रसाद म्हणाले की, अखिलेशकडे देण्याची क्षमता नाही. समाजवादी पक्षाचे अनेक नेते माझ्या विरोधात बोलत राहिले. मात्र अखिलेश यादव यांनी त्यांना कधीच रोखले नाही असेही पुढे ते म्हणाले.






























































