‘Solid speech’… राहुल गांधींच्या भाषणावर बॉलिवूड अभिनेत्री फिदा, कौतुकाचा वर्षाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरले. बेरोजगारी, चीन, पेगासस असे मुद्दे त्यांनी ठळकपणे मांडले. या भाषणाबाबत सोशल मीडियावर सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधींच्या या भाषणावर बॉलिवूड स्टार्सही आपलं मत व्यक्त करत आहेत. पूजा भट्ट आणि सिमी गरेवाल यांच्यासोबत स्वरा भास्करनेही काँग्रेस नेत्याच्या भाषणाबद्दल ट्विट केले आहे. स्वरा भास्करने याला ‘सॉलिड स्पीच’ ( Solid speech ) म्हटले आहे.

राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणाबद्दल स्वरा भास्करने ट्विट करत लिहिले आहे की, ‘काल लोकसभेत राहुल गांधींचे ‘सॉलिड’ भाषण. असंघटित क्षेत्राची दुर्दशा, बेरोजगारी, विद्यार्थी चळवळ, देशातील विविधतेचा आदर करण्याची गरज, शेतकरी चळवळ, सरकारची हुकूमशाही वृत्ती, सरकारी संस्थांची दशा, पेगासस आणि राष्ट्रीय सुरक्षा असे मुद्दे उपस्थित केले. अशाप्रकारे त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.’

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बेरोजगारीवर एक शब्दही नव्हता असे म्हटले होते. इतकंच नाही तर चीन आणि पाकिस्तानला वेगळे ठेवणं हे हिंदुस्थानचं धोरणात्मक उद्दिष्ट असायला हवं होतं, पण तुम्ही जे केलंय त्यामुळे त्यांना एकत्र आणलं आहे, असंही ते म्हणाले. आपण ज्या परिस्थितीला तोंड देत आहोत त्याला कमी लेखू नका. हा देशासाठी गंभीर धोका आहे, असंही ते म्हणाले होते.