जुन्या वादातून दोघांवर वार करणाऱ्या टोळीला अटक, स्वारगेट पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या वादातून दोघा तरूणांवर तलवारीने वार करणाऱ्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी 24 तासांत अटक केली आहे. अक्रम अजीज शेख (वय 26), अमित मल्लिकार्जुन शेकापुरे (वय 20), अन्वर उर्फ जंब्या शाकिर शेख (वय 19) , ओमकार दयानंद पवार (वय 19, सर्व रा. गुलटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राम राजू उमाप (वय 25) आणि गोविंद सुरेश कुंभार (वय 20) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

शहरातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलटेकडी परिसरात जुन्या वादातून दोन गटांमध्ये भांडणे झाली होती. त्या वादातून शेख टोळीने उमाप टोळीतील दोघांवर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी तपास पथकाकडून आरोपींचा शोध घेतला जात होता.

त्यावेळी पोलीस अंमलदार संदीप साळवे, सोमनाथ कांबळे, ज्ञाना बडे , मनोज भोकरे यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपींना अटक करण्यात आली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, एपीआय अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले यांच्या पथकाने केली.