
अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये होणारा टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप पुढील सहा महिन्यांनंतर म्हणजे आगामी वर्षी जूनमध्ये होणार आहे. नामिबियाच्या संघाने या स्पर्धेसाठी मंगळवारी तिकीट बुक केले. आप्रैका क्वालिफायरमधून टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणारा नामिबिया हा पहिला संघ ठरला.
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ खेळणार आहेत. नामिबियाच्या रूपाने आतापर्यंत या स्पर्धेसाठी 19 संघ पात्र ठरले आहेत. आता फक्त एका जागेसाठी झिम्बाब्वे, केनिया आणि युगांडा या संघांमध्ये चुरस असेल. नामिबियाच्या संघाने 5 पैकी 5 सामने जिंकून आगामी वर्षी होणाऱया टी-20 स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेले संघ
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, हिंदुस्थान, नेदरलॅण्ड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान आणि नामिबिया या संघांनी आतापर्यंत आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळविली आहे.































































