
गेल्या 14 वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही शोला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली आहे. त्यातील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांचा प्रेमाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘चंपक चाचा’ यांची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भट्ट शूटिंगच्या वेळी सेटवर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. शूटिंग सुरु असताना एका धावण्याच्या सीन दरम्यान त्यांच्या तोल जाऊन ते कोसळले आणि जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर त्यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्ट करण्यास सांगितले आहे. मात्र चंपक चाचा जखमी झाल्याच्या बातमीने चाहते मात्र नाराज झाले आहेत.
चंपक काका यांना किरकोळ दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे आता ते शूटिंग करू शकणार नाहीत. एकीकडे अमित यांच्या तब्येतीबद्दल चाहते आणि त्याचे सहकलाकार चिंतेत आहेत, अमित लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.


























































