
सामना प्रतिनिधी । पेण
दहीहंडी उत्सवादरम्यान महिलांसंदर्भात वादग्रस्त विधान करणार्या भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य महिला आयोग यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते व मानव अधिकार संघटनेचे अध्यक्ष मुनीर तांबोळी यांनी ही मागणी केली आहे.
राम कदमांवर तत्काळ कारवाई करा! उद्धव ठाकरेंची मागणी
‘घाटकोपरमध्ये दहीहंडी कार्यक्रमादरम्यान राम कदम यांनी महाराष्ट्रातील तमाम महिलांचा अपमान केला आहे. मुली पळवण्याची भाषा हे खुले आम करतात. महाराष्ट्रात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना जबाबदार माणसाने मुलींबाबत असे वक्तव्य करणे त्यांना शोभते का? महिलांबाबत असे बोलण्यास जीभ धजावतेच कशी? भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी मुलींबाबत जे वादग्रस्त वक्तव्य केले ते महाराष्ट्रातील सर्व महिलांचा अपमान करणारे वक्तव्य आहे, त्यांचा निषेध करून तांबोळी कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्राच्या रणरागिणीचं राम कदम यांना ओपन चॅलेंज, सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा
राम कदमांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीच्या डायलॉगसाठी केला गोविंदांचा अपमान
‘राम कदम यांनी मुली पळवून नेण्य़ाची भाषा वापरली आहे, त्यामुळे सर्व महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदवावा’, अशी मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते मुनीर तांबोळी यांनी केली आहे
राम कदम यांच्या पुतळ्याचं दहन, राज्यात निषेध मोर्चे
यावेळी बोलताना मुनीर तांबोळी म्हणाले की, ‘महाराष्ट्रात महिलांचा झालेला अपमान कधीच सहन केला जाणार नाही. राम कदम यांची हिम्मत झालीच कशी? रक्षाबंधनाला हजारो महिलांनाही यांना राख्या बांधल्या त्या रक्षणासाठी आणि हे त्यांना पळवून नेण्याची भाषा वापरतात, असा कसा भाऊ हा जो स्वतःच्या बहिणीला पळवtन नेण्याची भाषा सार्वजनिक ठिकाणी असंख्य जनसमुदाय व माध्यमांच्या समोर करतो. याला महिलांनी तिथेच चपलेने झोडले पाहिजे होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा व समस्त महिलांची माफी मागावी.’




























































