राम कदम यांच्या पुतळ्याचं दहन, राज्यात निषेध मोर्चे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इंदापूर

भाजपचे राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात उत्साहाच्याभरात ‘तुम्हाला पसंत असलेली मुलगी पळवून आणेन आणि तुम्हाला देईन’ असं भयंकर वक्तव्य केल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करत इंदापूर येथे युवा काँग्रेसच्या तरुणींनी त्यांचा पुतळा दहन करणार असल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या रणरागिणीचं राम कदम यांना ओपन चॅलेंज, सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा

राम कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना चप्पल काढून मारावं वाटतं, अशा संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गानं व्यक्त केल्या. तसेच फक्त माफी चालणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

इंदापूरमध्ये राम कदम यांच्या पुतळ्याला रावण कदम असं नाव देण्यात आलं. तसेच या पुतळ्याचं दहन करण्यात येणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.