विक्रोळीत विचित्र अपघात, टँकरने झोपलेल्या तिघांना चिरडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ,मुंबई

विक्रोळी पार्कसाइट येथे आज सायंकाळच्या सुमारास पार्क केलेल्या टँकरचा विचित्र अपघात होऊन त्यात दोन जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये दोघीही महिला असून एक मुलगा व एक पुरुष जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.

पार्कसाइट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘कैलास कॉम्प्लेक्स’ येथे ही दुर्घटना घडली. त्या ठिकाणी एका रस्त्याच्या कडेला पाच टँकर पार्किंगमध्ये उभे होते. त्यापैकी एका टँकरखाली दोन महिला, एक मुलगा आणि एक पुरुष झोपलेले होते.  दरम्यान, एक टँकर तेथे आला. तो टँकर पार्क करीत असताना चालकाचा अंदाज चुकला आणि टँकर जोरात जाऊन एका टँकरला धडकला. ही धडक इतकी जोरात होती की, त्यामुळे पुढील सर्व टँकर एकमेकांना धडकले. परिणामी झोपलेल्या व्यक्ती टँकरच्या चाकाखाली आल्या. त्यात दोन महिला ठार झाल्या, तर एक मुलगा गंभीर जखमी झाला. तर त्यांच्यासोबत असलेला पुरुष जखमी झाला असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी पार्कसाइट पोलीस अधिक तपास करीत आहेत.