
सामना ऑनलाईन । पाटना
बिहारमधील छपरा येथे ताप्ती- गंगा एक्सप्रेसला अपघात झाला असून रेल्वेचे 10 डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात 4 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी युध्दपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
Four injured after more than 10 coaches of Tapti-Ganga express train derail near Gautam Asthan,Chhapra in Bihar pic.twitter.com/UuTDn8vD32
— ANI (@ANI) March 31, 2019
सकाळी 8 वाजताच्या सुमारास छपरा येथून निघालेली ताप्ती- गंगा एक्सप्रेस 45 मिनीटांनी गौतम रेल्वे स्थानकावर पोहचत असताना हा अपघात झाला. अपघातामुळे छपरा-बलिया रेल्वेमार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
























































