
तमिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित शाळेच्या विद्यार्थिनींनी शिक्षकावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे.
चेन्नईतील एका शाळेत एक शिक्षक विद्यार्थिनींना त्रास द्यायचा. ऑनलाईन वर्ग सुरू असताना हा शिक्षक फक्त टॉवेलवर असायचा. अनेक विद्यार्थीनीच्या सोशल मीडिया फोटोवरील कमेंट्स करायचा. अनेक विद्यार्थिनींनी शाळेत तक्रारही केली होती, परंतु प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही.
अखेर काही विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर या अत्याचाराला वाचा फोडली. पोलिसांनी तातडीने या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत कारवाई केली. तसेच त्याची रवानगी तुरुंगात केली. शाळा प्रशासननेही आरोपीवर कारवाई करत त्याला नोकरीवरून काढून टाकले आहे.



























































