प्रवेशाच्या नावाखाली शिक्षिकेची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मॅनेजमेंट कोटय़ातून प्रवेश मिळवून देतो असे सांगून ठगाने महिला शिक्षिकेची फसवणूक केली आहे. फसवणूक प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी एक जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार या शिक्षिका असून त्या विलेपार्ले परिसरात राहतात. त्यांच्या मुलाचा बारावीचा निकाल लागला होता. त्यांच्या मुलाला बारावीत गुण कमी मिळाल्याने कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्या मॅनेजमेंट कोटय़ातून प्रवेश मिळतो का यासाठी चौकशी करत होत्या. पाच दिवसांपूर्वी त्यांच्या पतीला एक फोन आला. विलेपार्ले येथील नामांकित महाविद्यालयातून बोलत असल्याचे त्याने सांगितले.

मॅनेजमेंट कोटय़ातून प्रवेश मिळवून देतो. त्यासाठी दीड लाख रुपये खर्च येईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्याने आपण अवघे पाच हजार रुपये भरू शकतो असे त्याला सांगितले. त्याने तक्रारदार यांना भेटण्यास बोलावले. त्यानंतर दुसऱया दिवशी ठगाने पुन्हा त्यांना पह्न केला. मॅनेजमेंट कोटय़ातून प्रवेशासाठी साडेआठ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्याने काही रक्कम भरली. रक्कम भरल्यावर तक्रारदार हे महाविद्यालयात गेले. तेथे जाऊन चौकशी केली. तेव्हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी एक जणाविरोधात गुन्हा दाखल केला.