Photo – वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिल्यानंतर टीम इंडियाचे ट्रॉफीसोबत सेलिब्रेशन

दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर 7 गडी राखून विजय मिळवत कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आहे. के एल राहुल याच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजने दिलेले 120 धावांचे लक्ष्य पार केले.

शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने जिंकलेली ही पहिली कसोटी मालिका तर वेस्ट इंडीजविरुद्ध लागोपाठ जिंकलेली दहावी कसोटी मालिका आहे.