Ind Vs England Test Match – पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत हिंदुस्थानची 2-1 अशी आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विराट कोहलीच्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर इतिहास रचला. टीम इंडियाने ही कसोटी 157 धावांनी जिंकत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. हिंदुस्थानचा ओव्हल येथील 50 वर्षांनंतरचा पहिलाच कसोटी विजय ठरला हे विशेष. याआधी अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी क्रिकेट संघाने 1971 साली इंग्लंडला ओव्हलमध्ये हरवले होते. त्यानंतर विराट सेनेने 2021 सालामध्ये ओव्हल येथे करामत करून दाखवली. हिंदुस्थानच्या विजयात मुंबईकर खेळाडूंचा मोलाचा वाटा ठरला. रोहित शर्माचे दुसऱया डावातील शतक अन् शार्दूल ठापूरची दोन्ही डावांतील अर्धशतकी खेळी तसेच टिपलेले तीन बळी कसोटी विजयात महत्त्वाचे ठरले. याप्रसंगी जसप्रीत बुमराहने पाचव्या दिवसाच्या दुसऱया सत्रात केलेली भन्नाट गोलंदाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरलीय. रोहित शर्माची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

जेवणातून विकेटबाधा, बुमराहचा भन्नाट स्पेल

लंचपर्यंत समाधानकारक स्थितीत असलेला इंग्लंडचा संघ दुसऱया सत्रात कोलमडला. लंच ते टी या सत्रात इंग्लंडने चक्क सहा फलंदाज गमावले. जसप्रीत बुमराहने हे सत्र गाजवले. त्याने या मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाजी या सत्रात केली. रवींद्र जाडेजाने हसीब हमीदचा त्रिफळा 63 धावांवर उडवला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने ओली पोपचा (2 धावा) उत्पृष्ट इनस्विंगरवर आणि जॉनी बेअरस्टोचा (0) अफलातून यॉर्परवर त्रिफळा उडवला. रवींद्र जाडेजाने मोईन अलीला (0) शॉर्ट लेगमध्ये उभ्या बदली खेळाडू सूर्यपुमार यादवकरवी झेलबाद केले. अवघ्या सात धावांच्या अंतरांत इंग्लंडने हसीब हमीद, ओली पोप, जॉनी बेअरस्टो व मोईन अली हे चार फलंदाज गमावले. जसप्रीत बुमराहने 24व्या कसोटीत शंभर बळींचा टप्पा ओलांडला. हिंदुस्थानसाठी हा विक्रम ठरला.

रूटही त्रिफळाचीत, उमेशने गुंडाळले शेपूट

एका बाजूने फलंदाज बाद होत असतानाच कर्णधार जो रूट एकाकी झुंज देत होता. त्याने तीन चौकारांसह 36 धावाही केल्या. यावेळी टीम इंडियासाठी पुन्हा एकदा शार्दूल ठापूर धावून आला. त्याच्या गोलंदाजीवर जो रूट त्रिफळाचीत झाला. हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने इंग्लंडचे शेपूट गुंडाळले. त्याने ख्रिस वोक्स (18 धावा), व्रेग ओव्हर्टन (10 धावा) व जेम्स अॅण्डरसन (2 धावा) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 368 धावांचा पाठलाग करणाऱया इंग्लंडचा दुसरा डाव 210 धावांमध्येच आटोपला. जसप्रीत बुमराह, शार्दूल ठापूर, रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी दोन व उमेश यादवने तीन फलंदाज बाद केले.

यजमानांच्या सलामीवीरांचा विक्रम अन् मुंबईकर गोलंदाज चमकला

रोरी बर्न्स व हसीब हमीद या जोडीने बिनबाद 77 या धावसंख्येवरून सकाळच्या सत्रात पुढे खेळायला सुरुवात केली. दोघांनी आश्वासक सुरुवात केली. रोरी बर्न्सने पाच चौकारांसह 50 धावांची खेळीही साकारली. ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच या कसोटीत ठसा उमटवणारा मुंबईकर अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठापूरच्या अप्रतिम चेंडूवर रोरी बर्न्स यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद झाला. रोरी बर्न्स व हसीब हमीद या जोडीने 100 धावांची भागीदारी करीत नवा इतिहास रचला. हिंदुस्थानविरुद्ध खेळताना चौथ्या डावात इंग्लंडच्या सलामीवीरांनी 100 धावांची भागीदारी करण्याची 1964नंतरची ही पहिलीच खेप ठरलीय.

… अन् मलान धावचीत

हसीब हमीद व डेव्हिड मलान या जोडीने दुसऱया विकेटसाठी 20 धावा जोडल्या. पण या छोटय़ा भागीदारीत दोघेही चाचपडताना अधिक दिसले. शिवाय हिंदुस्थानी गोलंदाजांकडून सातत्याने दोघांवर दबाव टाकण्यात येत होता. याचप्रसंगी दोघांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. वन डे क्रिकेटमध्येही ज्या ठिकाणाहून धाव घेतली गेली नसती ती धाव कसोटी क्रिकेटमध्ये घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. बदली खेळाडू मयांक अग्रवालच्या अचूक थ्रोमुळे डेव्हिड मलान 5 धावांवरच धावचीत झाला. इंग्लंडची अवस्था उपाहाराला जात असताना 2 बाद 131 धावा अशी झाली.

संक्षिप्त धावफलक

  • हिंदुस्थान  –     पहिला डाव सर्व बाद 191 धावा
  • इंग्लंड –  पहिला डाव सर्व बाद 290 धावा
  • हिंदुस्थान  –     दुसरा डाव सर्व बाद 466 धावा
  • इंग्लंड –  दुसरा डाव सर्व बाद 210 धावा

(बर्न्स 50, हमीद 63, बुमराह 2/27, उमेश 3/60, जाडेजा 2/50, शार्दूल 2/22).