संजय दत्तचा ‘बाबा’ येतोय

138

सामना प्रतिनिधी । मुंबई

वडील – मुलाच्या सुंदर नात्याभोवती फिरणाऱया ‘बाबा’ या मराठी चित्रपटाची सध्या चर्चा आहे. संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता या दोघांची पहिली मराठी निर्मिती असलेला ‘बाबा’ येत्या 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर नुकतेच लाँच झाले.

‘बाबा’मध्ये ‘तनु वेड्स मनू’ आणि ‘हिंदी मिडीयम’ फेम दीपक दोब्रीयाल याची प्रमुख भूमिका आहे. तो या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यांच्याबरोबर नंदिता पाटकर चित्रपटात दिसणार आहे. त्यांना स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयकंत काडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी यांची साथ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर. गुप्ता यांनी केले आहे. सहनिर्मिती संजय एस. दत्त प्रॉडक्शन्स यांच्याबरोबर ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’च्या अशोक आणि आरती सुभेदार यांच्या बॅनरची आहे. ‘बाबा’चा टीझर म्हणजे निरागसतेची अत्यंत सुंदररीत्या किणलेली कथा, असे ट्विट मान्यताने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या