भाजपसाठी महागाई पूर्वी डायना होती, पण आता भावजय झालीय, तेजस्वी यादव यांचा भाजपवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांद्याचे दर वाढले की भाजपचे लोक कांद्याच्या माळा परिधान करून फिरायचे. महागाई पूर्वी यांच्यासाठी डायना होती, पण आता महागाई ही सत्ताधाऱयांसाठी भावजय झाली आहे, अशा शब्दात राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत वाढत्या महागाईच्या मुद्दय़ावरून तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितिशपुमार आणि भाजपला टीकेचे लक्ष्य केले आहे. कांद्याची किमतीने शतक तर बटाटय़ाने अर्धशतक ठोकले आहे. जेव्हा कांदा 40 रुपये किलोला विकला जात असे, तेव्हा भाजपचे लोक कांद्याच्या माळा घालून महगाईच्या नावाने सरकार विरोधात ओरडायचे. आता दिवसेंदिवस महागाई आणि पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असताना गप्प का? असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला आहे.