Telangana Accident : तेलंगणात भीषण अपघात, अल्पवयीन मुलीसह 6 जणांचा मृत्यू

तेलंगणाच्या सूर्यापेटमध्ये गुरुवारी भीषण अपघात घडला आहे. एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जबरदस्त धडक दिली. या अपघातात एका लहान मुलीसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात हैदराबाद येथून 180 किमी दूर असलेल्या कोडाडा शहरात झाला आहे.

कोडाड डीएसपी श्रीधर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारने हैदराबाद-विजयवाडा महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जबरदस्त धडकली. गुरुवारी मध्यरात्री जेव्हा हा अपघात घडला त्यावेळी 10 लोकं कारमधून प्रवास करत होते. त्यापैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले.