बवुमाला विश्रांती; मार्करमकडे नेतृत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानविरुद्ध 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱया मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपल्या तिन्ही फॉरमॅटचे संघ जाहीर करताना पांढऱया चेंडूचे नेतृत्व एडन मार्करमकडे सोपवले आहे, तर टेम्बा बवुमा कसोटीचे कर्णधारपद सांभाळेल. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱयावर हिंदुस्थानचा संघ टी-20, कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

कर्णधार टेम्बा बवुमा व वेगवान गोलंदाज पॅगिसो रबाडा यांना मर्यादित षटकांच्या मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र, तो कसोटी मालिकेत पुनरागमन करणार आहे. टेम्बा बवुमा हा टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळत नसल्यामुळे एडन मार्करमकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर बवुमा कसोटी मालिकेत संघाचे नेतृत्व करणार आहे.  कसोटी मालिकेच्या तयारीसाठी वेगवान गोलंदाज जिराल्ड कोत्जी, माकाx यान्सन व लुंगी एनगिडी हिंदुस्थानविरुद्धच्या तिसऱया टी-20त आणि वन डे मालिकेत खेळणार नाहीत.

हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिका दौऱयासाठी आधीच तीन संघ जाहीर केले आहेत. या दौऱयात ‘टीम इंडिया’चे 3 वेगवेगळे कर्णधार आहेत. सूर्यकुमार टी-20 मालिकेत, तर केएल राहुल वन डेमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळेल.

दक्षिण आफ्रिकेचे संघ

टी-20 संघ ः एडन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रेटकजे, नांद्रे बर्जर, जिराल्ड कात्झी, डोनोव्हन फेरेरिया, रीझा हेंड्रिक्स, माकाx यान्सन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिझार्ड विल्यम्स. वन डे संघ ः एडन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, नांद्रे बर्जर, टोनी डी जोर्गी, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, मिहाली पोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, रस्सी वेरेयन, लिझार्ड विल्यम्स. कसोटी संघ ः टेम्बा बवुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, जिराल्ड कात्झी, टोनी डीजॉर्गी, डीन एल्गर, माकाx यान्सन, केशव महाराज, एडन मार्करम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, किमगन पीटरसन, कगिसो स्टेब्स, ट्रायब्स, कायल व्हेरीन.