TPL 2022 ‘ती’ खेळाडू चॅम्पियन ऑफ लाईफ आहे, पेसकडून कौतुकाची थाप

टेनिस प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाला पुण्यातील बालेवाडी येथे सुरुवात झाली आहे. मुंबई लिऑन आर्मीचे मालक आणि माजी टेनिसपटू लिएंडर पेस यांनी टेनिस स्पर्धेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, हिंदुस्थानात टेनिस एका महत्वाच्या स्थानावर आहे. तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे. मात्र त्यांना पुढे येण्यास काही कालावधी जाऊ शकतो. हिंदुस्थानात जास्तीत जास्त टेनिस स्पर्धा होणे गरजेचे आहे. या स्पर्धेचा तिसरा आणि चौथा सिझन आमच्यासाठी चांगला होता. याआधी अनेक स्पर्धांचे आयोजन केले गेले होते मात्र चांगले खेळाडू असूनही त्या टिकल्या नाहीत. मात्र टेनिस प्रीमियर लीग कोरोनानंतर अजूनही सुरु आहे.

यावर्षी मॅथेव एबडेनला याची मला खूप जास्त आठवण येत आहे. चार महिन्यांपूर्वीच त्याने विम्बल्डन चॅम्पिअनशिप जिंकली होती. मी त्याच्यासोबत अनेकदा खेळलो आहे. माझ्या संघात Valeriya Strakhova ही युक्रेनची खेळाडू आहे. मी तिला चॅम्पियन मानतो. कारण तिचा देश, तिचे कुटुंब एका मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. इथे सर्वजण चषक, ग्रँड स्लॅम, मेडलची चिंता करत आहेत. पण तिच्या देशातली स्थिती पाहता ती चॅम्पियन ऑफ लाईफ आहे. ती या स्पर्धेत खेळत आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. या स्पेर्धेनंतर तिला तिच्या कुटुंबाला भेटायचे आहे. टेनिसच्या माध्यमातून मी जगभरातील लोकांना खेळाचे महत्व समजावून देत आहे.

मी वर्ल्ड चॅम्पियनशिप 6 वेळा जिंकली आहे. तुम्ही जेव्हा मुंबई कडून खेळता तेव्हा तुम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करता. जेव्हा तुम्ही वॉशिंग्टन कडून खेळता त्यावेळेस तुम्हाला तेथील लोकं हिरोप्रमाणे वागवतात. मी जेव्हा जेव्हा चॅम्पियनशिप जिंकलो तेव्हा मी देशाचाच विचार केला. खेळतांना हिंदुस्थान माझ्या हृदयात होता. खेळ हा धर्म, जात, भाषा, रंग यापलीकडे आहे. खेळ लोकांना एकत्र आणण्याचे काम करतो. देशात खेळाच्या मार्फत लोक एकत्र येत आहेत ही आनंदाची बाब आहे. टेनिस प्रीमियर लीगमुळे हिंदुस्थानातील तरुण मुलं जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत खांद्याला खांदा लावून खेळत आहेत. हि महत्वाची गोष्ट आहे.