नगर बस स्थानकात दहशतवादी मॉकड्रिलमुळे नागरिकांची धावपळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संक्रांतीचा दिवस… सकाळची वेळ… नगरचे माळीवाडा बस स्थानक… अचानक तीन बंदूकधारी बस स्थानकात घुसतात… काही कळण्याच्या आतच बस स्थानकाचा ताबा घेतात… त्यानंतर काही वेळातच ‘एसटीएस’चे पथक घटनास्थळी पोहोचते… पाठोपाठ शहरातील पोलीस ठाण्यांची पथकेही बस स्थानकावर पोहोचतात… पोलीस धडक कारवाई करून तीन बंदूकधाऱयांच्या मुसक्या आवळतात… या सर्व सिनेस्टाइल प्रसंगाने नगर बस स्थानकावरील प्रवाशांना काही काळ पळताभुई थोडी झाली. मात्र, सुरक्षेची चाचणी करण्यासाठी पोलिसांनी केलेली प्रात्यक्षिके असल्याचे समजल्यानंतर प्रवाशांचा जीव भांडय़ात पडला.

शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमधील अधिकारी आणि कर्मचाऱयांनी माळीवाडा बस स्थानकावर धाव घेतली होती. सर्वांत आधी ‘एटीएस’चे अधिकारी बस स्थानकावर दाखल झाले. त्यांनी दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.