
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर ‘ठाकरे’ या चित्रपटाचा परळीतील शिवसेनेच्या वतीने शो प्रायोजित करण्यात आला होता. हा शो हाऊसफुल्ल झाला. शहरातल्या नाथ चित्र मंदिर या चित्रपट गृहात या शो-चे आयोजन करण्यात आले होते.
माननीय शिवसेनाप्रमुखांचे जीवन, त्यांचा संघर्ष, त्यांनी उभी केलेली मराठी अस्मिता, हिंदुत्वासाठी पेटवलेलं रान हे सारं आजच्या पिढीला पाहायला, अनुभवायला मिळणार असल्याने अनेक चित्रपट गृहांमध्ये ऑनलाईन तिकीटे विक्री सुरू होताच हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले आहेत. तर शिवसैनिक आणि सामान्य जनतेला हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला मिळायला हवा म्हणून राज्यातील अनेक भागात शिवसेनेचे नेते, नगराध्यक्ष, नगरसेवकांनी फर्स्ट डे फर्स्ट शो बूक करून ठेवला आहे. त्यांच्याकडून जनतेला हा शो दाखवला जात आहे.
परळीत भव्य मिरवणूक काढून या चित्रपटाचे स्वागत करण्यात आले. शिवसेनेच्या वतीने श्री नाथ चित्र मंदिर येथे शो प्रायोजित करण्यात आलेल्या शो साठी परळीत भरभरून प्रतिसाद मिळाला. या वेळी शिवसेना पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, शिवसैनिक, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




























































