
सामना ऑनलाईन । ठाणे
प्रत्येक वेळी राष्ट्रकादीच्या स्थानिक नेत्यांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा वचपा लोकसभा निवडणुकीत काढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाऊन त्यांचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचार करणार नाही असे बंडाचे निशाण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फडकवले आहे. तशा आशयाचे पत्रच शहरातील सर्व ब्लॉक अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिले आहे. त्यामुळे राज्यात सर्व आलबेल चालले आहे असे दाखवणाऱ्या आघाडीची ठाण्यात बिघाडी झाली आहे.
निवडणुकांच्या वेळी आघाडी करायची आणि नंतर अपमान करायचा ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची वृत्ती झाली आहे असा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रामध्ये तक्रारींचा पाढा वाचला. नकी मुंबईचे राष्ट्रकादीचे नेते गणेश नाईक पालकमंत्री असताना ठाणे काँग्रेसच्या एकाही कार्यकर्त्याचे नाक एसीओच्या यादीमध्ये नक्हते याची आठवण पत्रामध्ये करून देण्यात आली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांना किश्कासात न घेता तत्कालीन श्रेष्ठाRनी काँग्रेसचा हक्काचा कळका-मुंब्रा किधानसभा मतदारसंघ राष्ट्रकादीला आंदण दिला, पण राष्ट्रवादीने पाठीत वार करून मुंब्य्रातून काँग्रेसला हद्दपार केले. त्यामुळे आता अपमान पुरे, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही म्हणजे नाहीच, असा उघडपणे बंड काँग्रेसने पुकारला आहे.































































