ठाण्यात रिक्षावर झाड कोसळून दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धावत्या रिक्षावर झाड कोसळून रिक्षातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री उशिरा तलावपाळी भागात घडली. या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनास्थळी धाव घेऊन कोसळलेल्या झाडाखाली अडकलेल्या रिक्षातून दोघांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तलावपाळी परिसरातील रेड जिम समोरील महाकाय झाड अचानक कोसळले. ही घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. हे झाड रस्त्यावरून चाललेल्या रिक्षावर कोसळल्याने रिक्षाचा चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.