
अभियंत्याच्या घरी चोरी करून पैशाची बॅग टाकून चोरटा पळाला. नागरिकाने पाठलाग केल्यावर चोरटय़ाने ती बॅग रिक्षा स्टॅण्डजवळ टाकून पळ काढला. संधीचा फायदा घेऊन रिक्षाचालक त्या बॅगेतील पैसे घेऊन पसार झाले. अखेर दिंडोशी पोलिसांनी चोरटय़ासह अन्य चार रिक्षाचालकांना गजाआड केले. शफिक अतिउल्ला ऊर्फ सोनो असे चोरटय़ाचे नाव आहे. सेवराम मांगलीया, अब्बास जारवाला, अशफाक शेख, इमामुद्दीन पटेल, समीर शाह अशी त्या रिक्षाचालकांची नावे आहेत.
वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे, उपनिरीक्षक अजित देसाई, सतीश भालेराव आदींच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेजमध्ये पोलिसांना एक रिक्षाचा नंबर दिसला. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. पोलिसांनी त्या रिक्षाचालकाची माहिती काढली. त्या माहितीवरून पोलिसांनी सेवराम, अब्बास, इमामुद्दीन आणि समीरला ताब्यात घेतले. त्या चौघांनी बॅगेतील पैसे वाटून घेतले होते. त्या पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याना पोलीस कोठडी सुनावली आहे.

























































