
सामना प्रतिनिधी । पुणे
घरफोडी केल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून सराईत गुन्हेगारांनी घरावर पेट्रोल टापून संपूर्ण घरच पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने घरातील लोकांना वेळीच जाग आल्याने त्यांनी आरडओरडा करून शेजारच्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. ही घटना कासेवाडीतील वचन मित्रमंडळ येथे रविवारी पहाटे घडली.
अविनाश ऊर्फ बारक्या अवचरे, अश्रफ शेख (दोघे रा. मित्रता तरुण मंडळ, कासेवाडी, भवानी पेठ) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अजय परदेशी (वय ३९, रा. कासेवाडी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी अजय परदेशी यांच्या पत्नीने बारक्या अवचरे याच्याविरोधात घरात चोरी केल्याची तक्रार खडक पोलिसांकडे केली होती. त्याचा राग अवचरेला होता. त्या रागातून परदेशी यांचे घर अवचरे आणि अश्रफ शेख या दोघांनी पहाटे चारच्या सुमारास घराच्या दारावर पेट्रोल आतून पेटवून दिले. परदेशी यांच्या वहिनींना ही बाब लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा केला. शेजाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. अवचरे आणि अश्रफ या दोघांचा तपास सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक एस. डी. पोमन तपास करीत आहेत.





























































