एच. एनर्जीच्या गॅस पाईपलाईनसाठी जमीन मोजणीला ग्रामस्थांचा विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

जयगड येथील प्रस्तावातील एच.एनर्जी गॅस पाईपलाईनसाठी नांदिवडे येथे आज जमीन मोजणीच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला. प्रकरण न्यायप्रविष्ठ असून जागेचा निर्णय येईपर्यंत मोजणी करू नका. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

नांदिवडे परिसरातील ग्रामस्थांना जमीन मोजणी संदर्भात नोटीसा देत आज गुरूवारशी अकरा वाजल्यापासून पोलीस बंदोबस्तात जमीन मोजणी सुरु करण्यात आली. जमीन मोजणी सुरु होताच माजी पं. स.सदस्य विवेक सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली विरोध केला.ज्या जमिनीतून गॅस पाईपलाईन जाणार आहे ती जमीन शेत जमीन असून गॅस पाईपलाईन साठी दुसरा पर्यायी मार्ग निवडावा, अशी मागणी ग्रामस्थांची असून सध्या न्यायालयीन लढाई सुरू असून न्यायालयाचा निकाल येई पर्यंत जमीन मोजणी करू नये अशी आमची भूमिका असल्याचे विवेक सुर्वे यांनी सांगितले.