
माढा तालुक्यातील मोडनिंब येथील रेल्वे स्थानक रोडवरील स्टेट बँक आँफ इंडियाच्या एटीएममधील 12 लाख 80 हजार 800रुपये चार अज्ञात चोरट्यांनी चोरले आहेत. ही घटना मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मोडनिंब रेल्वे स्थानक रोडवरील स्टेट बँक आँफ इंडियाचे एटीएम 25 ते 30 वयोगटातील अज्ञात चार चोरट्यांनी कापून रक्कम लांबवली आहे. ते पांढऱ्या रंगाच्या गाडीतून आले होते. एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारुन त्यांनी एटीएम मशीन गॅस कटरने कापले आणि त्यातील 12 लाख 80 हजार 800 रुपये मशीनमधील ड्रावरसह चोरुन नेली. तसेच त्यांनी टेभुर्णी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारुन तेथेही चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत करत आहेत.



























































