चाकूरमध्ये भरदुपारी घरफोडी; एक लाख 90 हजार रुपयांचा ऐवज लांबवला

567

चाकूर येथे अज्ञात चोरट्यांनी भर दुपारी बंद घर फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. या घरफोडीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे एक लाख 90 हजाराचा ऐवज लांबवण्यात आला. चाकूर पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चोरी प्रकरणी उमाकांत दिगांबर जोशी (रा. विश्वशांतीधाम मंदिरजवळ, चाकूर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 18 मार्च रोजी दुपारी 1 वाजता तक्रारदार, त्यांची पत्नी, आई, बहिण असे अहमदपूर तालूक्यातील मौजे धानोरा येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. सायंकाळी 4 वाजता उमाकांत जोशी एकटेच परत आले. त्यावेळी घराच्या दाराचा कडीकोंडा तोडण्यात आलेला दिसला. घरात बेडरुममधील कपाट आणि त्याचे लॉकर तोडलेले दिसून आले.रोख रक्कम 22 हजार रुपये, एक तोळ्याच्या सोन्याच्या 3 अंगठ्या (किंमत 90 हजार रुपये), एक 5 ग्रॅमची अंगठी व एक सहा ग्रॅमची अंगठी (किंमत 33 हजार रुपये), एक दीड तोळ्याचे सोन्याचे लॉकेट (किंमत 45 हजार रुपये) असा एकूण एक लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. चाकूर पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या