हिंदुस्थासोबतच या दहा देशातही साजरी होते दिवाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानातील कानाकोपऱ्यात दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दिव्यांची आरास करून, रांगोळी काढून, फटाके फोडत दिवाळी दणक्यात साजरी केली जाते. हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी होत असली तरी इतरही असे काही देश आहेत जिथे हिंदुस्थानप्रमाणेच दिवाळी साजरी केली जाते. जाणून घेऊया अशा देशांविषयी…

फिजी –
फिजी या देशळात हिंदुस्थानी नागरिकांची संख्या जास्त असल्याने या देशातही दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी होते. फिजीमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी देखील असल्याने शाळा, कॉलेज, कार्यालये बंद असतात.

इंडोनेशिया –
इंडोनेशिया या देशात देखील दिवाळी साजरी होते. या देशातील दिवाळी हि हिंदुस्थानप्रमाणेच पारंपारिक पद्धतीने साजरी कतेली जाते.

मलेशिया –
मलेशियात दिवाळीला हरी दिवाळी म्हटलं जातं. इथल्या परंपरा या हिंदुस्थानपेक्षा वेगळ्या आहेत. इथे दिवाळीच्या दिवशी संपूर्ण शरीराला तेल लावून नंतर आंघोळ केली जाते. मलेशियात फटाक्यांवर बंदी असल्याने फटाके फोडले जात नाहीत.

मॉरिशिअस –
मॉरिशिअसची 50 टक्के लोकसंख्या ही हिंदू असल्याने या देशातही दिवाळी दणक्यात साजरी होते.

सिंगापूर –
सिंगापूरमध्ये लिटील इंडिया असा एक भाग आहे. त्या भागात हिंदुस्थानींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे इथे देखील रांगोळी, दिव्यांची आरास, सजावट करून दिवाळी साजरी केली जाते.

नेपाळ –
नेपाळमध्ये दिवाळी ही तिहार नावाने ओळखली जाते. येथे देखील हिंदुस्थानप्रमाणे लक्ष्मीची पूजा केली जाते. नेपाळमधील हा दुसरा मोठा सण आहे.

श्रीलंका –
श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मीय असल्याने तेथेही दिवाळी उत्साहात साजरी केली जाते.

कॅनडा –
कॅनडाला मिनी पंजाबच म्हटलं जातं कारण इथे पंजाबी लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे इथे दिवाळी अगदी पंजाबी स्टाईलने धूमधडाक्यात साजरी होते.

इंग्लंड –
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम आणि लेयस्टर इथे दिवाळी साजरी केली जाते. इथे हिंदुस्थानींची संख्या जास्त असल्याने या ठिकाणी दिवाळीत अगदी आनंददायी वातावरण असतं.

त्रिनिदाद आणि तोबागो –
त्रिनिदाद आणि तोबागो या कॅरेबियन बेटांवरही दिवाळी साजरी केली जाते. इथे दिवाळीत रामायण कथन करण्याची परंपरा आहे.