ट्रायल मारायला गेला, पुन्हा नाही आला; खारघरमध्ये मोटारसायकल चोरण्यासाठी चोराची नवी शक्कल

चोरी करण्यासाठी चोर प्रत्येक वेळी मोडस ऑपरेंटी वापरतात. तसाच कारनामा एका सराईत चोराने खारघरमध्ये केला आहे. हा चोर ग्राहक म्हणून मोटारसायकलच्या शोरूममध्ये गेला. तिथे त्याने अनेक मोटारसायकली पाहून एक पसंत केली. खरेदी करण्यापूर्वी या मोटारसायकलची ट्रायल मारतो, असे त्याने शोरूमच्या मालकिनीला सांगितले आणि मोटारसायकल घेऊन गेला तो पुन्हा आलाच नाही. मोटारसायकल घेऊन गेलेला ग्राहक तासाभरानंतरही पुन्हा न आल्यामुळे शोरूमच्या व्यवस्थापनाला थेट पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली.

खारघर येथील बेलपाडा गावातील साईबाबा मंदिराजवळ यासीन खान यांचे यासीन मोटर्स या नावाने शोरूम आहे. ते तिथे सेवंâड हॅण्ड गाड्या विकतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हा मोटरसायकल खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. त्यांच्या शोरूममध्ये एक चोर ग्राहक बनून आला आणि त्याने एक गाडी पसंत केली. ही गाडी आपल्याला लगेच खरेदी करायची आहे, तिची ट्रायल मिळेल का, असे शोरूमच्या मालकिनीला विचारले. यावेळी खान यांच्या पत्नीने अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून ट्रायल घेण्यासाठी गाडी सुपूर्द केली. त्यानंतर हा चोर बेलपाडा रोडने साईबाबा मंदिराजवळून विरुद्ध दिशेने गाडी घेऊन गेला तो परत आलाच नाही. शोरूममधील कर्मचाNयांनी उत्सव चौकापर्यंत जाऊन पाहिले असता तो सापडला नाही. याप्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करीत आहेत.