दोन नाही तीन वेळा टोचणार सुई, Covaxin च्या बुस्टर डोसला क्लिनिकल ट्रायलची परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bharat-biotech-covaxin

देशात कोरोना व्हायरसच्या विरोधात लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. लसीच्या तिसऱ्या डोसची तयारी सुरू आहे. हा बूस्टर डोस (Booster Dose) असल्याचे सांगितले जात आहे. तज्ज्ञांच्या एका पॅनलने ‘भारत बायोटेक’ची लस कोव्हॅक्सीनच्या (Covaxin) तिसऱ्या डोसला परवानगी दिल्याचे वृत्त आहे. तिसरा म्हणजेच बूस्टर डोस दुसऱ्या डोसच्या सहा महिन्यांनी दिला जाईल. यामुळे फायदा होईल की कोरोना व्हायरसच्या नवा वेरिएंट पासून बचाव होईल आणि नवे स्ट्रेन म्यूटेशन तयार होणार नाही.

तज्ज्ञांच्या पॅनलचं म्हणणं आहे की, भारत बायोटेक (Bharat Biotech) आपलं व्हॅक्सीन Covaxin चा तिसरा बूस्टर डोस त्या वॉलेंटियर्सना पहिले देईल, जे क्लीनिकल ट्रायलमध्ये सहभागी होते. भारत बायोटेकने सरकारसमोर प्रस्ताव ठेवला होता की तिसऱ्या डोसनंतर कोरोना विरुद्ध शरीराची इम्यूनिटी अनेक वर्षांसाठी वाढेल. यानंतर तज्ज्ञांच्या पॅनलने बूस्टर डोसला परवानगी दिली आहे.

भारत बायोटेकच्या प्रस्तावावर सबजेक्ट एक्सपर्ट कमेटीने (SEC) सांगितले आहे की बूस्टर डोसचा अभ्यास सेकेंड फेजच्या क्लीनिकल ट्रायलवाल्या वॉलंटियर्सवर करण्यात यावा. या वॉलंटियर्सना कोव्हॅक्सीन 6 माइक्रोग्रॅमचे दोन डोस मिळाले आहेत. बूस्टर डोस त्या लोकांना पहिल्यांदा देण्यात येईल ज्यांना कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस गेल्यावर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये देण्यात आला आहे.

भारत बायोटेक या वॉलंटियर्सना तिसरा बूस्टर डोस दिल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत त्यांना देखरेखीखाली ठेवणार आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात होणारे बदल, रोगप्रतिकारक शक्ती वाढते की कमी होते, तसेच नव्या वेरिएंट पासून बचाव करण्यास किती सक्षम आहे हे सर्व नोंदवले जाईल. सोबतच साइड इफेक्ट्सचाही अभ्यास केला जाईल.

कंपनीचा दावा आहे की, कोव्हॅक्सीन (Covaxin) च्या तिसऱ्या बूस्टर डोसनंतर शरीरात T Cells ची संख्या वाढेल. यामुळे भविष्यात कोरोनाव्हायरसच्या हल्ल्यांपासून वाचण्यास मदत मिळेल. इतकेच नाही तर तिसरा डोस फायदेशीर ठरला तर सौम्य आणि गंभीर कोरोना संक्रमणाला रोखण्यास मदत मिळेल.

बुस्टर डोस लागल्यानंतर कोरोनाची नवी लाट रोखण्यास किंवा त्याच्यातील अंतर अधिक ठेवण्यास मदत होईल.