चकमकीच्या ठिकाणी जाणाऱ्या लष्कराच्या वाहनाचा अपघात, तीन जवानांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

जम्मू कश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील बडिगाम येथे सुरू असलेल्या चकमकीसाठी निघालेल्या लष्कराच्या जवानांच्या वाहनाचा कानिपोरा गावाजवळ अपघात झाला. या भीषण अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला तर पाच जवान जखमी झाले.


बर्फ वितळत असल्याने कानिपोरा गावातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. त्या ठिकाणावरून जाणारी लष्कराची एक गाडी पलटी झाली. यात अपघातात आठ जवान जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे दोघांना मृत घोषीत करण्यात आले. त्यानंतर उरलेल्या सहा जवानांना तत्काळ लष्कराच्या श्रीनगरमधील रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला.


सुरुवातीला हा अपघात स्थानिकांच्या दगडफेकीमुळे झाल्याचे पसरले होते. मात्र नंतर लष्कराच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दगडफेक झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.