ग्रेनेड हल्ल्यात तीन जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरात सोथेरेमध्ये दहशतवाद्यांनी जवानांवर केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात सुरक्षा दलाचे तीन जवान आज जखमी झाले. दुसरीकडे बंदीपोरेच्या हाज्जीन भागात दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या दोन नागरिकांची सुरक्षितपणे मुक्तता केली. सोपोरेमधील एका गावाची जवानांनी तपासणी केली तेव्हा दोन ते तीन दहशतवादी गावात अडकले. याच दहशतवाद्यांनी हातबॉम्ब, ग्रेनेड जवानांच्या दिशेने भिरकावले.

बारामुल्लामध्ये चकमक
कश्मीरात बारामुल्लामधील बाबा नेमशी येथेही आज सायंकाळी 4.45 वा. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक उडाली. रात्री उशिरापर्यंत या चकमकीचा तपशील मिळू शकला नाही.