
नेवासा फाटादरम्यान सेंट मेरी स्कूल रोडसमोर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या गोळीबार व मारहाण प्रकरणातील तीन आरोपींना नेवासा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेवासा फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी दोघांवर बीअरच्या बाटलीने मारहाण करून गावठी कट्टय़ातून तीन फैरी झाडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. याबाबत आकाश कुसळकर याने दिलेल्या फिर्यादीवरून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विजय करे यांनी स्वतः तपास करून आरोपी अनिल चव्हाण, मयूर वाघ व ज्ञानेश्वर दहातोंडे या तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, शनिवार(दि. 23)पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


























































