सांगली-सातारा मतदारसंघात तीन उमेदवार रिंगणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषद निवडणूक 2026 सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 7 पैकी 4 उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवार अर्ज माघारी घेण्याच्या अखेरीच्या दिवशी चार उमेदवारांनी माघार घेतली. आता रिंगणात तीन उमेदवार असून, त्यात भाजपचे धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमरसिंह खाशेराव जगताप आणि अपक्ष किशोर हणमंत धुमाळ यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली, तर तानाजी भगवान पाटील (अपक्ष), प्रताप ऊर्फ बाळासाहेब धोंडीराम (अपक्ष), मयूर बाबासा पाटील (अपक्ष), मेढे संजय नायकू मेंढे (अपक्ष) या चौघांनी आज निवडणुकीतून माघार घेतली आहे.

निवडणूक लढणारे उमेदवार ः धैर्यशील ज्ञानदेव कदम, मु. पो. गोरेगाव (वांगी), ता. खटाव, जि. सातारा (भाजप). अभयसिंह खाशेराव जगताप, मु. पो. वरकुटे-मलवडी, ता. माण, जि. सातारा (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार).किशोर हनमंत धुमाळ, रा. 123 बागडवाडा, शिवाजीनगर, गोडोली, सातारा (अपक्ष).