सहाय्यक निबंधक कार्यालयातील तीन लाचखोर कर्मचाऱ्यांना अटक

434
bribe

तक्रारीची चौकशी करून ऑडीट अहवाल चांगला देण्यासाठी 8,500 रूपयांची लाच मागणाऱ्या शिरूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

शिरूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची चौकशी करून चौकशीमध्ये चांगला अहवाल देण्यासाठी 8,500 रूपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 8,500 रूपयांची लाच घेताना शिरूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहाय्यक निबंधक संजय कारभारी सोनवणे ( वय 56), मुख्य लिपीक तुकाराम कोंडीबा वायबसे ( वय 42), लेखा परिक्षक पद्माकर अवधूत कुलकर्णी ( वय 57) या तिघांना रंगेहाथ पकडले. लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपाधिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या