Maratha Reservation Row मराठा आरक्षणासाठी आणखी तिघांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणासाठी मंगळवारी आणखी तीन तरुणांनी आत्महत्या केली. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करणारांची संख्या वीस पेक्षाही जास्त झाली आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात असलेल्या मैराळ सावंगी येथील अशोक रंगनाथ जाधव (30) या तरुणाने नदीत उडी मारून आत्महत्या केली. जालना जिल्ह्यातील कचरेवाडी येथे सोपान बाबूराव कचरे (30) याने मराठा आरक्षणासाठी विहिरीत उडी घेतली. मराठा आरक्षण आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. छत्रपती संभाजीनगर शहरातील पिसादेवी भागातील शुभम अशोक गाडेकर या तरुणानेही मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करत गळफास घेतला.