बनावट नंबर प्लेट लावणारे तिघे अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोटारसायकलला बनावट नंबर प्लेट लावून वाहन चालवणाऱ्या तिघांना डी.एन. नगर पोलिसांनी अटक केली. साहिल मोहम्मद युसूफ बलोच, उमेश रौफ शेख आणि शाहिद मोहम्मद युसूफ अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

नीलेश पाटील हे डी.एन. नगर वाहतूक चौकीत कार्यरत आहेत. शनिवारी ते डी. एन. नगर मेट्रो स्टेशनजवळ डय़ुटीला होते. तेव्हा तीन तरुण विरुद्ध दिशेने मोटारसायकल चालवून येत असल्याचे दिसले. त्यामुळे पाटील यांनी त्या तिघांना थांबवले. त्यांच्या मोटारसायकलचा क्रमांक ई चलन मशीनमध्ये तपासला. त्या मोटारसायकलचा नंबर हा एका वाहनाचा असल्याचे समजले. ते वाहन एका व्यक्तीच्या नावावर होते. त्या तिघांनी त्या वाहनाच्या नंबरचा गैरवापर करून त्या नंबरची प्लेट मोटारसायकलला लावली होती. फसवणूक केल्याप्रकरणी त्या तिघांविरोधात डी. एन. नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.