टीप्स स्वयंपाकघरातून…

टीप्स स्वयंपाकघरातून

  • हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा. यामुळे लोहाचे प्रमाण वाढते आणि शरीराला याचा फायदा होतो.
  • डाळिंब्यांची (कडवे वाल) उसळ शिजत असतानाच त्यामध्ये थोडेसे दूध घातले तर डाळिंब्या अख्ख्या राहतात. त्या मेणासारख्या शिजत नाहीत.
  • सलाड करायच्या आधी सर्व भाज्या काही वेळ बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात त्यामुळे त्या टवटवीत दिसतात.
  • साबुदाण्याची खिचडी करताना त्यावर दूध किंवा ताक शिंपडावे. आवडत असल्यास काकडी बारीक चिरून घालावी. यामुळे खिचडी नरम, मोकळी आणि चवदार होते.
  • वरण शिजवताना तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग, हळद आणि चमचाभर साजूक तूप घालावे. यामुळे डाळ नरम शिजते आणि स्वादही छान येतो.
आपली प्रतिक्रिया द्या