
22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. पृथ्वीवरच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी हा दिवस जगभरात पाळण्यात येतो. प्रयागराज येथील विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर धरून लोकांनी पर्यावरणाचे संरक्षण करावे, असा मेसेज पृथ्वी दिनाच्या पूर्वसंध्येला दिला.