मेष ( ARIES – Tuesday, November 16, 2021)
कामात प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठांशी वाद टाळा. मानसिक संतुलन राखणे गरजेचे आहे. तसेच दिवस तणावात जाईल मात्र संध्याकाळी शुभवार्ता समजेल.
भाग्य रंग – पिवळा
वृषभ – (TAURUS – Tuesday, November 16, 2021)
तरुणांना थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. नवीन नोकरीची संधी मिळेल. उद्धटपणाने कोणाशीही वागू नका, त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. शैक्षणिक प्रगती होईल. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल.
भाग्य रंग – लाल
मिथुन – ( GEMINI Tuesday, November 16, 2021)
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. त्यामुळे दिवस खूप चांगला जाईल. आर्थिक येणी वसूल होतील.नोकरीत बढती मिळेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
भाग्य रंग – निळा
कर्क – (CANCER Tuesday, November 16, 2021)
कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. काहींना अचानक धनलाभ होईल. प्रवासाचा योग येईल.
भाग्य रंग – हिरवा
सिंह – ( LEO Tuesday, November 16, 2021)
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत. – प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून आज सरप्राईज भेट मिळेल.
भाग्य रंग – आकाशी
कन्या (VIRGO Tuesday, November 16, 2021)
शत्रूंवर मात कराल. काही कामे धाडसाने पार पाडाल.जुनी येणी वसूल होतील. बाहेरचे खाणे शक्यतो टाळा, पोटाच्या तक्रारी जाणवतील. त्याकडे दुर्लक्ष नको.
भाग्य रंग – तपकिरी
तूळ ( LIBRA Tuesday, November 16, 2021)
आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील. कामाबाबत जिद्द व चिकाटी वाढेल, आर्थिक व्यवहार जपून करा . कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ देऊ नका. अंगाशी येईल.
भाग्य रंग – गुलाबी
वृश्चिक ( SCORPIO Tuesday, November 16, 2021)
नव्या ओळखी होतील. खर्च वाढतील, पैसे जपून वापरा. शक्तीचा उपयोग न करता युक्तीचा वापर करा. नक्कीच फायदा होईल.
भाग्य रंग – पांढरा
धनू ( SAGITTARIUS Tuesday, November 16, 2021)
रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेक गोष्टी सोप्या होतील. जोडीदाराची साथ लाभेल. सहकारी वर्ग तुमच्या विरोधात बोलण्याची शक्तता आहे. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल.
भाग्य रंग – गुलाबी
मकर ( CAPRICORN Tuesday, November 16, 2021)
राजकीय-सामाजिक कार्यात प्रगती होईल. कला, क्रिडा, साहित्य क्षेत्रात नाव मिळेल. जीवनाला कलाटणी देणाऱ्या घटना घडल्या.
भाग्य रंग – राखाडी
कुंभ राशी भविष्य (AQUARIUS Tuesday, November 16, 2021)
वैवाहिक अडथळे दूर होतील. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मनाला शांतता मिळेल. महत्वाचे आणि धाडसी निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. पूर्वजांचे आशिर्वाद फळास लागतील.
भाग्य रंग – बदामी
मीन (PISCES Tuesday, November 16, 2021)
आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्यांना काही सूचक घटना समजतील. मैत्रीत झालेला गैरसमज दूर होतील. संसारात शुभवार्ता कळेल. कामाची प्रशंसा होईल. सामाजिक कार्यात तुमचे विचार कौतुकास्पद ठरतील.
भाग्य रंग – मोती




























































