तोगडियांनी स्थापन केली आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

विश्व हिंदू परिषदेतून बाहेर पडल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी रविवारी अहमदाबादमध्ये नवीन संघटनेची स्थापना केली. ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’ असे या संघटनेचे नाव आहे. प्रवीण तोगडिया हे या नव्या संघटनेचे अध्यक्ष असतील. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या स्थापनेवेळी तोगडिया समर्थकांनी डोक्यावर घातलेल्या टोपीवर ‘हिंदू ही आगे’ असे लिहिले होते. तर व्यासपीठाकर भारत माता, गो-माता, गणपती आणि अशोक सिंघल यांची प्रतिमा ठेवली होती. नवीन टीम असली तरी तोच आक्रमकपणा राहील असे तोगडिया यांनी यावेळी सांगितले. एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे समजले जाणारे तोगडिया हे काही महिन्यांपासून मोदींनाच टार्गेट करीत होते.