पीरियडमध्ये असाल तर बॅच लावून या, कंपनीचे महिलांना अजब फर्मान

2798

एका कंपनीने महिला कर्मचाऱ्यांना पीरियडमध्ये (मासिक पाळी) असाल तर विशिष्ट बॅच लावून येण्याचे फर्मान सोडले आहे. ही कंपनी जपानमधील असून ‘मिची काके’ स्टोर असे तिचे नाव आहे. हा बॅच बघून स्टोरमध्ये येणाऱ्या महिला ग्राहकांमध्येही पीरियड बद्दल जनजागृती होईल. असा दावा कंपनीने केला आहे.

‘मिची काके’  ही कंपनी महिलांशी संबंधित पीरियड व सेक्शुअल उत्पादनांची निर्मिती करते. यामुळे जपानी महिलांची पीरियडबद्दल असलेली रुढीवादी विचारसरणी बदलेल. असे मत कंपनीने व्यक्त केले आहे. जपानमध्ये पीरियडबद्दल अनेक रुढीवादी विचारसरणी आहे. येथील माहिला पीरियडवर  बोलण्यास कचरतात आणि टाळतात. महिलांना पीरियडमध्ये जे बॅच लावण्यास सांगण्यात आले आहे ते Seiri-chan या लोकप्रिय कार्टून कॅरेक्टवर आधारित आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या