टोलनाक्यांवर आंदोलन करणार; राजधानीचे रस्ते रोखणार

दिल्लीत सुरू असलेले आंदोलन आणखीन आक्रमक करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. केंद्र सरकारने कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने संघटनांनी हा पवित्रा धारण केला आहे.

– दिल्लीच्या सिंधु सीमेवर शेतकरी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मोदी सरकारच्या शेतीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ येत्या मंगळवारी (दि. 8) देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला देशभरातून प्रतिसाद मिळेल. देशातील सर्व टोलनाके ताब्यात घेऊन आंदोलन करून तसेच राजधानी दिल्लीकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील, असा इशारा भारतीय किसान युनियनचे सरचिटणीस हरिंदरसिंग लखोवाल यांनी दिला.

– कृषी कायदे रद्द करावेत हीच आमची प्रमुख मागणी आहे. ही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. शेतकरी आता मागे हटणार नाही असे राकेश टिपैत आणि हनान मोलाह यांनी सांगितले.

– मोदी सरकारने कायदे मागे घेतलेच पाहिजेत असे आम्ही दोन बैठकांमध्ये सांगितले. आज (दि. 5) विज्ञान भवनात होणाऱया बैठकीत सहभागी होऊन हे सांगणार आहोत असे शेतकरी नेते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या