
सामना ऑनलाईन । मुंबई
बहुप्रतिक्षित धमाल सीरीजमधील टोटल धमालचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पूर्वीचे शिलेदार अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी असून आता अजून नवे स्टारही दाखल झाले आहेत. या चित्रपटात अजय देवगण, बोमन इराणी, संजय मिश्रा सुध्दा आहे. तसेच या चित्रपटात अनेक वर्षांनी अनिल कपूर आणि माधुरी दिक्षितची जोडीही पहायला मिळणार आहे. तर जॉनी लिव्हर या चित्रपटाची रंगत वाढवणार आहे. नव्या चित्रपटाची थीम वाईल्ड असून सिने तारकांसह जंगली प्राणीही प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणार आहेत.
गेल्या काही दिवसांत चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांमध्ये ट्रेलरबाबत उत्सुकता होती. आता ट्रेलर रीलीज झाल्याने धमलाच्या प्रेक्षकांना चित्रपटाची आस लागली आहे. 22 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.




























































