
सामना प्रतिनिधी । धर्माबाद
निर्मल जवळील दिलालपूर चौरस्ता येथे ट्रक आणि बोलेरो मँक्स पिकअप यामध्ये झालेल्या भीषण अपघातात शेख नसीरुद्दीन गौसोद्दीन (३५) व शेख सलीम शेख अहमद येताळकर(२५) हे दोघेही जागीच ठार झाले आहेत. हे दोघेही फुलेनगर धर्माबाद येथील रहिवासी होते.
धर्माबाद येथील वेल्डींग दुकानात बैलगाडीची चाके तयार करून ती देण्यासाठी सकाळी जात असताना दिलालपूर चौरस्त्यावर सात वाजता भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. नसीरुद्दीन यास तीन मुले व एक मुलगी असून शेख सलीम याचा सहा महिन्यापूर्वी जारीकोट येथील युवतीशी साखरपुडा झालेला आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





























































