मुंबई-पुणे ‘एक्प्रेस वे’वर वाहतूक  नियमांची ऐसी तैसी …

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई – पुणे ‘एक्प्रेस वे’ वर भरधाव वेगाने वाहने चालविण्याने मोठय़ा प्रमाणात अपघातांना आमंत्रण मिळत असते. त्यामुळे प्रवाशांच्या अक्षरशः जीवावर बेतत असते. असे अपघात होऊ नयेत म्हणून महामार्ग पोलीस वेळोवेळी कारवाई करीत असतात. 5 ते 10 जुलै या सहा दिवसांत ‘मुंबई – पुणे एक्प्रेस वे’वर आरटीओ विभागाने केलेल्या कारवाईत एकूण 760 वाहनांना ई – चलान बजावण्यात आले असून एकूण 23 लाख 71 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. या मोहिमेत ‘लेन कटिंग’ केल्याच्या प्रकरणात सर्वाधिक 533 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

 ‘मुंबई – पुणे एक्प्रेस वे’वर ओव्हरस्पीडने नुकत्याच झालेल्या एका अपघाताचा भीतिदायक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. त्यामुळे परिवहन विभागाने पुणे आरटीओ आणि पनवेल आरटीओ विभागाची स्पेशल टीम स्थापन केली होती. मुंबई ते पुणे एक्प्रेस हायवेवर 5 ते 10 जुलैदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली असून या विशेष मोहिमेत ‘ओव्हरस्पीड’ प्रकरणात 114 वाहनांवर कारवाई करण्यात आली, तर ‘ओव्हरलोड’ प्रकरणात 44 वाहनांना दंड आकारण्यात आला. ‘लेन कटिंग’ प्रकरणात सर्वाधिक 533 वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला.