आजाराने ग्रस्त असताना उपचारांची दिशा काय असावी, जीवन संरक्षक प्रणाली सुरू ठेवावी किंवा ठेवू नये यासाठी अत्यवस्थ असलेल्या रुग्णाने तिच्या जिवंतपणी लेखी स्वरूपात दिलेल्या भविष्यकालीन वैद्यकीय निर्देशांचे थोडक्यात इच्छापत्राचे पालन व्हावे, या उद्देशाने पालिकेने 24 विभागात त्या त्या विभागातील आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे आरोग्य अधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उपचारांबाबत कार्यवाही करणार आहेत. त्यामुळे त्या अत्यवस्थ रुग्णाच्या इच्छेनुसार त्यांना पुढील उपचार मिळणे शक्य होणार आहेत.